सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वाधार योजना

योजना राबविणे मागची उद्दिष्टे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही जिल्ह्याच्या ठिकाणी इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करते.


योजनेचे लाभाचे स्वरूप

अनु.जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना रु. 51000/- हजार दोन हप्त्यांमध्ये दिले जातात. (भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारा निर्वाह भत्ता वजा करुन) या व्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना रु. 5000/- व इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रु. 2000/- शैक्षणिक साहित्यासाठी दिले जातात.


अटी व शर्ती

• विद्यार्थी अनु. जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा
• विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
• विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.
• नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 05 किमी. पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा.
• विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
• इयत्ता 11 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचा नसावा.
• इयत्ता 11 वी मध्ये विद्यार्थ्यास किमान 50 % (उत्तीर्ण) गुण असावेत./
• या योजनेमध्ये अनु. जाती व नवबौद्ध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची टक्केवारी 40 % इतकी असेल.


संपर्क

संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य,
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

अर्ज करण्याचे व लाभाचे मुख्य टप्पे